शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजित ठाणे हेरिटेज वॉकमधून शिलाहार ते मराठा राजवटीपर्यंत वैभव अनुभवलेल्या ठाण्यातील ऐतिहासिक श्री कौपीनेश्वर मंदिर आणि मासुंदा परिसराला भेट देण्यात आली. श्री सिद्धिविनायक मंदिर आणि पेढ्या मारुती मंदिराला भेट देऊन त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी जवळपास ५० जणांनी सहभाग नोंदवला होता.