प्रदर्शन

ज्या शस्त्रास्त्रांच्या योगाने आपल्या पूर्वजांनी विजयाच्या गुढी उभारल्या. ज्या तलवारींनी रणभूमी गाजवून शत्रूला नामोहरण केले. ज्या नाण्यांनी इथल्या आपल्या संस्कृतीची वैभवलक्ष्मी समृद्ध केली. याचे स्मरण करून आपल्या समृद्ध आणि संघर्षमयी इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या नाण्यांच्या आणि शस्त्रांच्या इतिहासाविषयी समाजामध्ये जागृतात निर्माण व्हावी म्हणून शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे प्रदर्शन आयोजित केले जातात.