लोनाड

शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे ठाणे हेरिटेज वॉक कल्याण-भिवंडी जवळील लोनाड या गावी आयोजित केला गेला होता. इ.स. पूर्व दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून जगाच्या नकाशावरील भरभराटीला असलेल्या बंदरापैकी एक प्रसिद्ध बंदर आणि बाजारपेठ म्हणजे कल्याण. सातवाहनांच्या काळापासून कल्याणचे ऐतिहासिक संदर्भ व उल्लेख आपल्याला मिळतात. अनेक शिलालेख तसेच प्रवासी पेरिप्लसच्या प्रवासवर्णनांत महत्वाची बाजारपेठ म्हणून कल्याणचा उल्लेख ' कालियान ' अथवा ' ' कलियान ' असा येतो.

s