त्रिकालभूषण ज्ञानाचे , हे सदावर्त मंदिर,
सामान्यसही इथे लाभेल सरस्वतीचा वर ||
मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातले पहिले ग्रंथालय ठाणे येथे १८९३ साली स्थापन झाले. जवळजवळ १२६ वर्षे समाजाची वाचनाची आणि ज्ञानाची भूक भागवणाऱ्या अश्या या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आणि ग्रंथालय पाहण्याची संधी दि.२१ एप्रिल २०१९ रोजी शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ठाणे हेरिटेज वॉकमधून उपस्थितांना मिळाली.