भल्याचाच प्रकार असून याचे पाते दुधारी असून साधारण 2 ते 3 फूट असते, पकड ही लाकडी दांड्याची असून त्याला लाकडी तीन गोळे लावलेले असतात. शत्रूची फळी तोडण्यासाठी अथवा बेभान होऊन शत्रूची गर्दी मारण्यासाठी याचा वापर केला जात असे. याचे वार जंगली काठीच्या प्रकारासारखेच पाहायला मिळतात.
याचाच अजून एक प्रकार आपल्याला कोकण प्रांतात विशेषकरून पाहायला मिळतो, यात काठीला टोकाजवळ एक आणि हाताच्या पकडजवळ दोन असे तीन लाकडी गोळे वापरलेले दिसतात. वरील दोन्ही प्रकार बाण्याचेच असले तरी पहिला प्रकार शस्त्र असून दुसरा प्रकार सरावासाठी तालमीत वापरला जात असे.