हे लहान शस्त्र असून सुऱ्याच्या प्रकारातील आहे. याचाही वापर छुपे शस्त्र म्हणून हातघाईच्या लढाईवेळी केला जात असे. याचे वार मुख्यत्वे पोटाच्या, छातीच्या, खांद्याच्या आणि पाठीच्या भागात वेगवेगळ्या प्रकारे हाताची पकड करून केले जातात. या शस्त्रात बरेच प्रकार असून, परकीयांच्या आक्रमणाबरोबर अथवा व्यापाऱ्यांकडून भारतात आलेले पहायला मिळतात.