कट्यार

हे लहान शस्त्र कमरेच्या शेल्यात ठेवत असत. अगदी हातघाईच्या लढाईच्या वेळी निर्णायक क्षणी याचा वापर शत्रूवर केला जात असे. याचे वार मुख्यत्वे मुष्टियुद्धातील प्रहारा प्रमाणे असून छातीत,पोटात आणि पाठीवर भोसकून केले जात. क्वचितचं काट-छाट वार पण केले जात. यासाठी मनगटात ताकद असायला हवी.