तलवारीपेक्षा याचे पातं लांबीने असून त्याच्या दोन्ही बाजूस धार असते. विजयनगर साम्राज्यापासून यांचा युद्धात वापर होत होता, पण शिवकाळात मराठा सैनिकांनी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसून येतो. पट्ट्याची वैशिष्ट्यपूर्ण मूठ ही हाताच्या संरक्षणासाठी उपयोगात येते, त्या मुठीला खोबळा म्हणतात.
युद्धातील पट्ट्यांची पाती (ब्लेड) ही तलवारी प्रमाणे मजबूत असतात, परंतु मर्दानी खेळाचे सादरीकरण अथवा सराव करताना वापरले जाणारे ब्लेड हे लवचिक असतात.