गोफण

हे मुख्यतः शेतीसाठी वापरण्यात येणारे एक मानवचलीत उपकरण आहे. गोफासारखे विणलेल्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवल्या जातो. त्यानंतर गोफण हातात धरुन वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविली जाऊन आवश्यक वेग आल्यावर त्यातील एक दोरी सोडून दिली की, ठेवलेला दगड वेगाने सुटतो आणि हवा तेथे जाऊन पडतो. दगड कुठे जाऊन पडावा वा कुठे लागावा यासाठी कौशल्याची गरज असते. हेच मावळ्यांच्या सुरवातीच्या युद्धातील प्रमुख शस्त्र होते.