भाला

मुक्त आणि अमुक्त अश्या दोन्हीप्रकारे शत्रूवर याचा वापर करता येतो. पूर्वी काठीला अनुकुचीदार टोक काढून त्याला आगीत भाजले जात असे; तसेच प्राण्यांची हाडे, दगडांना टोक काढून पुढे बांधत असत. पुढच्या काळात धातूचा वापर करून फाळ (टोक) तयार केले जाऊ लागले.

पायदळात भालाईतांची म्हणजेच भाला चालवणारे अथवा बिनीची तुकडी असे. पायदळ, घोडदळ आणि गजदळ यांत वेगवगेळ्या प्रकारचे पवित्रे करून भाले वापरले जात असले तरी, प्रतिस्पर्ध्याचा लांबून वेध घेताना फेकण्याची पद्धत अथवा पवित्रा जवळजवळ थोड्याफार फरकाने सारखाच आहे.