भारतासोबत इतरही देशांचे युद्धातील तलवार हेच प्रमुख शस्त्र होते, याचे कारण प्रत्यक्ष युद्धात निर्णायक आणि शत्रूचा अचूक वेध घेणे. या शस्त्राचे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ भरपूर मिळतात. प्राचीन मंदिरांच्या शिल्पांवरून या शस्त्रात झालेले बदल आपल्याला बघायला मिळतात. भारतासारख्या विरभूमीच्या इतिहासात तलवारीला अनन्य साधारण महत्व आहे.
शिवकाळात चांगली कामगिरी केल्याबद्दल मोजक्याच घराण्यांना तलवारीच्या पात्याचा मान मिळाला होता, हे आपल्याला ऐतिहासिक पुराव्यांवरून कळते.