गिर्यारोहण - किल्ले प्रतापगड

शयुद्धनीती, युद्धकौशल्य, युद्धनेतृत्व आणि युद्धव्यवस्थापन या पैलूंचा प्रत्यक्ष त्या स्थळावर जाऊन अभ्यास करून मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा रोमांचकारी अनुभव घेण्यासाठी दि. ४ जून २०२२ रोजी शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे प्रतापगड युद्धभूमीला भेट देण्यात आली होती. या पहिल्या अभ्यास मोहिमेचे नाव होते, #समरांगण_प्रतापगड... इतिहास अभ्यासक,लेखक श्री पराग लिमये सर आणि त्यांचे मित्र इतिहास अभ्यासक श्री अमोल मांडके यांनी संपूर्ण प्रतापगड युद्धाच्या दृष्टीने त्याचा इतिहास - भूगोल समजावून सांगताना,
◆ प्रतापगड युद्धाचे लष्करी दृष्टीकोनातून महत्व काय होते.
◆ अफजलखानाला समूळ गारद करण्यासाठी महाराजांनी कोणती " रणनीती " आखली होती? त्यासाठी त्यांनी व्यूहरचना कशी केली?
◆ जावळीच्या अनुकूल भूगोलाचा उपयोग करून शिवरायांनी इतिहास कसा घडवला ? प्रत्यक्ष जावळीचा प्रदेश कुठपर्यंत पसरला होता,त्याची ऐतिहासिक नकाशांवरून माहिती दिल्यावर या युद्धाची व्याप्ती आणि परिणाम समजायला लागतात.
◆ खानाची भेट महाराजांनी कोठे घेतली? कशी घेतली? त्या भेटीत नक्की काय झाले ?
◆ जावळीच्या खोऱ्यात आपले सरदार व मावळे त्यांनी कोठे कोठे लपवले होते?
◆ सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रतापगड युद्धाचे दूरगामी परिणाम असे झाले की महाराजांनी आदिलशहाचा बराचसा प्रदेश स्वराज्यात सामील केला, पन्हाळा स्वराज्यात आला तो याच युद्धाच्या धाकावर.
◆ शह आणि काटशह यांनी रंगलेला बुद्धिबळाचा हा खेळ शिवरायांनी शक्ती व युक्तीने कसा जिंकला..?
या व अश्या अनेक रोमांचकारी प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष या मोहिमेत जाणून घेता आलीत. खास आकर्षण म्हणजे प्रतापगड युद्धात वापरलेली ऐतिहासिक शस्त्रे मुलांना हाताळायला मिळालीत.
जवळच असलेल्या उमरठ येथील सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या गावी आणि समाधी स्थळाला भेट देण्यात आली.