शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित दुर्गराज रायगड - ऐतिहासिक भ्रमंतीनिमित्त कळवा येथील सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मित्रमंडळातील जेष्ठ सभासदांना पहिल्या दिवशी शिवथरघळ,पाचाड कोट, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घडवण्यात आले. रात्री जेवणानंतर संस्थेच्या मुलांनी प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके दाखवलीत. दुसऱ्यादिवशी पहाटे रोपवे ने रायगडावरील वास्तूंचा इतिहास मांडून समग्र रायगड दर्शन घडविले गेले त्यातील काही ऐतिहासिक क्षण.